बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी अधिकर पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर बेळगावकरांना आता अनेक सुविधांचा लाभ घेता येण्याची चिन्हे दिसत आहेत. विविध नकाशांसाठी अर्ज कराव्या लागणाऱ्या नागरिकांना आता एका क्लिकवर माहिती उपलब्ध होणार आहे.
फोडी म्हणजेच जमीन विभाजन, जमीन परिवर्तन, ११ इ स्केच, आणि इतर मॅप आता ऑनलाईन माध्यमातून उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी आज दिली आहे. सदर सुविधांचा लाभ घेण्यासाठी आता नागरिकांना रांगेत उभारण्याची गरज नाही.
शासनाच्या rdservices.karnataka.gov.in या वेबसाईटवर हि सारी माहिती आपल्याला मिळू शकते. नकाशा मंजूर झालेला असल्यास अर्जदारांना याच वेबसाईटवर सदर नकाशा डाउनलोड करता येणार आहे.
यासाठी कोणताही अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार नसून नागरिकांचा सर्वेक्षण कार्यालयात जाण्याचा त्रास कमी होणार आहे. आपण केलेल्या अर्जाची स्थितीही आपण उपरोक्त वेबसाईटवर पाहू शकतो, अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली आहे.