राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशावरून आजपर्यंत अनेक टीकाटिप्पण्या झाल्या. सध्या याच टीकाटिप्पण्या पुन्हा एकदा जोर धरू लागल्या असून संघाचे चड्डी प्रकरण आता पुन्हा एकदा चर्चेत येऊ लागले आहे. माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनीदेखील आता या टीकाटिप्पण्यांमध्ये भाग घेतला असून ‘आपापली चड्डी काढा परंतु राज्यातील जनतेची चड्डी काढू नका’ असा टोला हांलाय.
काँग्रेसने संघाच्या गणवेशावरून केलेली टिप्पणी आणि त्यावरून गृहमंत्र्यांनी दिलेले उत्तर यादरम्यान या चर्चेत कुमारस्वामींनी उडी घेत आपली चड्डी आपण सांभाळा मात्र राज्यातील जनतेची चड्डी काढू नका असा टोला लगावलाय. बेळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना कुमारस्वामींनी हि प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
ते राज्यातील जनतेसमोर सन्मानाची वागणूक ठेवा, राज्यातील जनतेचा अवमान होणार नाही याची खबरदारी घ्या, असा सल्लाही त्यांनी दिलाय.
यापुढे कोणत्याही मशिदीत देवस्थान शोधू नका असे विधान मोहन भागवत यांनी केले होती. काल ऊर्जामंत्री सुनील कुमार यांनी मोहन भागवत यांच्या विधानाला सहमती दर्शविली. रघुपति भट यांनी आता थांबले पाहिजे.
आणखी एका ठिकाणी असेच घडेल. आता एका ठिकाणी येऊन थांबण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. शिवाय या कामांव्यतिरिक्त इतरही काम आहेत याकडे सरकारने लक्ष केंद्रित करावे, अशा कानपिचक्याही त्यांनी दिल्या आहेत.