27 जून रोजी सीमाभागातल्या मराठी माणसाने जिल्हा प्रशासनाला आपली ताकद दाखवून देण्यासाठी आणि कायद्यानुसार मिळणारे हक्क मिळवण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मध्यवर्ती समितीचे कार्याध्यक्ष आणि माजी आमदार मनोहर किणेकर यांनी केले.
बुधवार दि 8 जून रोजी बेळगाव जवळील बेनकनहळळी इथे तालुका समितीच्या वतीने 27 रोजी च्या मोर्चाची जनजागृती बैठक पार पडली त्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी मध्यवर्ती म ए समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, खजिनदार प्रकाश मरगाळे तालुका समितीचे सरचिटणीस एम जी पाटील युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मंडलिक,आंबेवाडी ग्राम पंचायत अध्यक्ष चेतन पाटील,दत्ता उघाडे आदींनी आपले विचार मांडत मोर्चाच्या घोषवाक्या प्रमाणे ‘एक मराठा लाख सीमावासीय’ ही मराठी माणसाची ताकद आपण दाखवून देऊया आणि मोर्चा यशस्वी करून प्रशासनाला जागे करूया मराठीत परिपत्रिके मिळवून घेऊया असे आवाहन केले.
बेनकनहळळी ग्रामस्थांनी शेकडोच्या संख्येने मोर्चात सहभागी होण्याची निर्धार यावेळी व्यक्त केला.हुतात्मा दिनाच्या जनजागृती नंतर आता समितीच्या नेत्यांनी मराठी कागदपत्रांच्या मागणीचा मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार करत सभा बैठका घेत आहेत .
27 जून रोजीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा यशस्वी करण्यासाठी जोरदार तयारी ग्रामीण भागात सुरू करण्यात आली आहे गावोगावी बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.27 रोजी मराठी माणूस पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार करणार आहे.