आश्रय फाउंडेशनच्या सहयोगातून राईट्स लिमिटेडच्या वतीने होमगार्ड्स आणि नागरी संरक्षण विभागातील कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. .
हे आरोग्य तपासणी शिबीर राईट्स लिमिटेडच्या एक भाग होता. सीसीएसार उपक्रमांतर्गत आश्रय फाउंडेशनच्या सहयोगाने या तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
आश्रय फाउंडेशनच्या सल्लागार सभासद आणि डॉ. अश्विनी बागोजी यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. आश्रयाच्या मुलींच्या प्रार्थनेने या तपासणी शिबिराची सुरुवात झाली. नागरी संरक्षण आणि होमगार्ड्स विभागाचे डिस्ट्रिक्ट कमांडंट आणि चीफ वॉर्डन डॉ. किरण रुद्र नाईक, यांच्याहस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन भारत माता पूजनाने झाले.
आश्रय फाउंडेशनच्या अध्यक्ष नागरत्ना यांनी या आरोग्य शिबिरात आरोग्याच्या महत्वासंदर्भात मनोगत व्यक्त केले. तसेच सर्व स्वयंसेवक व नागरी संरक्षण व गृहरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी व शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
आयएमए अध्यक्ष डॉ. राजेश्वरी अंगोला, डॉ. राजेंद्र अनगोळ, डॉ. महादेवी, श्री ऑर्थो आणि ट्रॉमा सेंटरचे कर्मचारी, डॉ. मसरत खाजी, डॉ. झरीना, कसबेकर मेटगुड रुग्णालयाचे कर्मचारी, डॉ. बिंदू होसमनी, इंडियन डेंटल असोसिएशनच्या सहसचिव डॉ. अश्विनी नारसन्नवर, सिद्धार्थ नेत्रालयाचे डॉ. सिद्धार्थ पुजारी, भरतेश होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे डॉ. जयराज पाटील, डॉ. बसवराज अडी आदि वैद्यांचा आरोग्य तपासणी शिबिरात सहभाग होता.
२०७ स्वयंसेवक आणि कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोफत आरोग्य तपासणी, प्रोटीन पावडर, रक्त तपासणी, मधुमेह तपासणी आदींसह अनेक प्रकारची आरोग्य तपासणी करण्यात आली.
या आरोग्य तपासणी शिबिराच्या आयोजनात आश्रय फाउंडेशनच्या अध्यक्षा सफला नागरत्ना, आश्रय संस्थेचे संजय तेरणी, कुणाल, ज्ञानेश, वर्ष, प्रसाद, कुतुबु, साहित्या, नलीन, अयान, अर्शद, कोमल, मधुश्री, विनोद, मंजुनाथ, राहुल आदींनी परिश्रम घेतले.