कर्नाटक उत्तर-पश्चिम पदवीधर/शिक्षक मतदारसंघासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी मतदार यादी जाहीर झाली असून एकूण ९५ मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
नवी दिल्ली निवडणूक आयोगाने या मतदार याद्यांसाठी अनुमती दिली असून इंग्रजी आणि कन्नड अशा दोन भाषांमध्ये हि मतदार यादी जाहीर झाली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागाधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, शिक्षण विभागाच्या सूचना फलकांवर या याद्या पाहता येऊ शकतात,
अशी माहिती बेळगाव जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी एका परिपत्रकाद्वारे प्रसिद्धीस दिली आहे.
विशेषता पदवीधर मतदार संघामध्ये बेळगाव शहर आणि तालुक्यातील अनेक नवीन मतदारांनी मतदारासाठी यादी मध्ये नाव सामावून घेण्यासाठी अर्ज दाखल केला होता त्यामुळे अनेकांची नावे या वेळेला मतदार यादीत समाविष्ट झाली आहेत मराठी भाषिकांनी या वेळेला या मतदार यादीत नोंदणी केलेली आहे मागील वेळेपेक्षा अधिक मराठी पदवीधर मतदार यादीत समविष्ट आहेत.