कर्नाटक वायव्य व शिक्षकांनी कर्नाटक वायव्य पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा निश्चित करण्यात आलेले नाही. त्यामुळे उमेदवारांना कितीही खर्च करण्याची मुभा आहे. तथापि प्रलोभन आणि आमिष दाखवता येणार नाही.
विधान परिषद निवडणुकीची घोषणा झाली असून येत्या 13 जूनला मतदान होणार आहे. कर्नाटक वायव्य पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.
निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. राष्ट्रीय, प्रादेशिक आणि अपक्ष उमेदवार प्रचारामध्ये उतरले आहेत. उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही त्यामुळे उमेदवारांना कितीही खर्च करण्याची मुभा असली तरी प्रलोभन आणि आमिष दाखवता येणार नाही. विधान परिषदेसाठी येत्या सोमवार दि. 13 जूनला सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होईल. त्यानंतर 15 जूनला मतमोजणी होणार आहे.
कर्नाटक वायव्य पदवीधर शिक्षक मतदारसंघ सार्वत्रिक निवडणूक 2022 शी संबंधित जिल्ह्यात 25 मतदान केंद्रे स्थापन करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोग नवी दिल्लीने मान्यता दिली आहे. मतदान केंद्रांची यादी इंग्रजी व कन्नड भाषेतून मुद्रित करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसिल कार्यालय, महापालिका पालिका, नगरपरिषद, नगरपंचायत तसेच शिक्षण खात्याच्या सूचना फलकांवर यादी पहावयास मिळेल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी कळविले आहे.