संघर्षाचा शेवट नेहमी सन्मानात होतो या ऐतिहासिक सत्याची प्रचिती सीमाभागातील जनतेला अनुभवावयास मिळाले. समिती आणि संघर्ष हे समानार्थी शब्द आहेत. संघर्षासाठीच समिती जन्माला आली आहे.गेली60 वर्षे समिती आपल्या न्याय हक्कासाठी संघर्ष करत आली आहे., आणि करत आहे.
समिती नेत्यांनी कधीच अपेक्षा केली नाही की जिल्हा प्रशासनाने आम्हाला मान सन्मान द्यावा. आदर सत्कार करावा. काही प्रसंगी तर तासन तास प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या दरवाजाबाहेर समितीनिष्ठ तिष्टत उभा राहत.
त्यांनी याबाबत कधीच तक्रार केली नाही. संघर्षातून आलेले हे नेते,संघर्षाच्या वाटेवरचे काटे समजून घेऊन होते. त्यांच्यासाठी कधीच रेड कार्पेट घातले जाणार नव्हते. परंतु बेळगावला लाभलेले नूतन डी सी नितेश पाटील यांनी आपल्या संवेदनशीलतेची प्रचिती दाखवून दिली.
सोमवारी समिती नेते जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना भेटायला गेले असताना त्यांच्या भेटीसाठी ते सकाळी 11 वाजता कार्यालयात दाखल झाले. त्यावेळी ते बाहेरच बाकड्यावर भेटीच्या आदेशाची प्रतीक्षा करत बसले होते.ज्यावेळी कक्षात त्यांना बोलावण्यात आले त्यावेळी माध्यम प्रतिनिधी आणि समिती नेत्यांच्या समक्षचं डीसी त्यांच्या पीए वर भडकले आणि त्यांनी समितीच्या नेते मंडळींना गेस्ट रुम मध्ये का बसवला नाही असे सुनावत पी ए चा समाचार घेतला. त्यावेळी कक्षात उपस्थित पत्रकार देखील अवाक झाले.
प्रशासकीय अधिकारी कुणाचाही प्रतिनिधी असला तरी त्यांना संघर्षाची समज असते. हा प्रदीर्घ काळ चाललेला मराठी माणसाचा संघर्ष हा ऐतिहासिक आहे याची जाणीव जिल्हाधिकाऱ्यांना असल्याने त्यांनी दिलेली ती दाद समजली जाईल.