बेळगावमध्ये आज पहाटे खून प्रकरणातील फरारी आरोपी विशाल सिंग याच्यावर पोलिसांनी गोळीबार केला. पोलिसांवर प्राणघातक शस्त्राने हल्ला केल्यामुळे स्वसंरक्षणार्थ पोलीस अधिकाऱ्यांना गोळीबार करावा लागला आणि त्यामध्ये आरोपीच्या पायाला गोळी लागून तो जखमी झाला, अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ एम. बी. बोरलिंगय्या यांनी दिली.
खून प्रकरणातील आरोपी विशाल सिंग याच्यावर पोलिसांनी फायरिंग केल्याची घटना आज सकाळी घडली. त्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस आयुक्त डॉ. बोरलिंगय्या प्रसारमाध्यमांशी बोलत होते. बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या खून प्रकरणाशी संबंधित विशाल सिंग या आरोपीला आमचे अधिकारी पकडण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी त्याने पोलिसांवर हल्ला केल्यामुळे स्वसंरक्षणार्थ पोलीस अधिकाऱ्यांना त्याच्यावर फायरींग करावे लागले.
पोलिस अधिकाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात पायाला गोळी लागल्याने आरोपी विशाल सिंग जखमी होऊन आमच्या ताब्यात आला. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. पकडण्यात आलेल्या जखमी आरोपीवर अनेक गुन्हे पोलिसात नोंद असून आणखी कोणत्या गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग आहे? याचा शोध घेतला जात आहे, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले.
पोलीस पथक आपल्याला पकडण्यासाठी येत असल्याचे समजताच आरोपी विशाल सिंग याने मोटरसायकलवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याला आडकाठी केली असता त्याने धारदार शस्त्राने पोलिसांवर प्राणघातक हल्ला केला.
तेंव्हा स्वसंरक्षणार्थ पोलीस अधिकाऱ्यांनी त्याच्यावर गोळीबार केला. त्या गोळीबारात पायाला गोळी लागल्याने जखमी झालेल्या आरोपीला सध्या उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
Good job sir