बेळगाव जिल्हा को-ऑपरेटिव्ह बँक असोसिएशनच्यावतीने आयोजित जिल्ह्यातील विविध सहकारी बँकांच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या नूतन चेअरमनपदी निवड झालेल्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.
सदर सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी बेळगाव जिल्हा को -ऑप. बँक असोसिएशनचे अध्यक्ष बाळाण्णा कग्गणगी हे होते. प्रारंभी असोसिएशनचे सेक्रेटरी पी. एस. ओऊळकर यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर अध्यक्ष बाळाण्णा कग्गणगी यांच्या हस्ते मराठा बँकेच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे नूतन चेअरमन बाळासाहेब काकतकर (असोसिअशन उपाध्यक्ष) यांचा सत्कार करण्यात आला. बसवेश्वर बँकेच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे नूतन चेअरमन बाळाण्णा कग्गणगी (असोसिएशन अध्यक्ष) यांचा सत्कार असोसिएशनचे गौरव अध्यक्ष एम. डी. च्युनमरी यांच्या हस्ते करण्यात आला.
गोकाक अर्बन बँकेच्या बोर्ड मॅनेजमेंटचे नूतन चेअरमन एम. डी. च्युनमरी (असोसिएशन गौरवाध्यक्ष) यांचा सत्कार असोसिएशनचे खजिनदार ए. के. महाजन शेट्टी (पाच्छापूर बँक अध्यक्ष) यांच्या हस्ते करण्यात आला. बेल्लद बागेवाडी अर्बन बँकेच्या बोर्ड मॅनेजमेंटचे नूतन चेअरमन आर. टी. शिराळकर (असोसिएशन संचालक) यांचा सत्कार असोसिएशनचे सेक्रेटरी पी. एस. ओऊळकर (तुकाराम बँक संचालक) यांच्या हस्ते करण्यात आला.
या प्रसंगी दैवज्ञ बँकेचे माजी जनरल मॅनेजर एम. एस. शेठ, शांतापण्णा मिरजी, बँकेचे माजी जनरल मॅनेजर बी. ए. भोजकर आणि गोकाक अर्बन बँकेचे जनरल मॅनेजर एस. एस. पाटील यांनी उपरोक्त निवडीबद्दल गौरवोद्गार काढले.
कार्यक्रमास बेळगाव जिल्हा को -ऑपरेटिव्ह अर्बन बँक असोसिएशनचे पदाधिकारी वाय. एस. मिरची, एस. बी. निलजगी, जी. एस. बी पत्तेन्नावर, एस. एन. रेवणकर, रत्नप्रभा बेल्लद, मराठा बँकेचे जनरल मॅनेजर संतोष धामणेकर, एस. जी. ढवळेश्वर तसेच बेळगाव जिल्ह्यातील विविध सहकारी बँकांचे पदाधिकारी उपस्थित होते.