बेळगाव जवळील कल्याण ब्रिज खाली क्रुझर पलटी होऊन मृत्युमुखी पडलेल्या गोकाक तालुक्यातील सात कामगारांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.
बेळगाव दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मयतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये नुकसान भरपाई मदत म्हणून देण्याची घोषणा केली आहे.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले कामगार अपघातात मयत झाले ही अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद गोष्ट आहे. अपघातात अजूनही काही जण गंभीर जखमी झाले आहेत सरकार कडून मयतांच्या वारसांना पाच लाख रुपये व जिल्हाधिकाऱ्यांकडून दोन लाख रुपये दिले जातील असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.
जे कामगार अपघातात जखमी झाले आहेत त्यांच्या उपचाराची व्यवस्था करण्यात आली असून, जखमीवरील सर्व खर्च राज्य सरकारकडून करण्यात येईल असेही आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
भ्रूण प्रकरणी कडक कारवाई
मुडलगी येथील सात भ्रूण हत्त्या प्रकरणी कुणीही सामील असेल त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.झालेली चूक सिद्ध झाल्यास जेलला देखील पाठवू असा इशारा देखील मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिला.
मुडलगीचे भ्रूणहत्या प्रकरण हा खूप गंभीर विषय आहे. बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी यावर कारवाई करून ते नर्सिंग सीज केलेले आहे. मी देखील या विषयांची सखोल चौकशी करण्याचे आदेश बजावले आहेत. यातजे कोणी सहभागी असतील त्यांना जेलची हवा खावी लागेल असेही त्यांनी स्पष्ट केले.