कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्न तज्ञ समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी बैठक घेतली आहे.
बुधवारी मुंबई मुक्कामी तज्ञ समितीची बैठक झाली त्या बैठकीत सीमाप्रश्नाच्या खटल्यात ला चालना देण्यासंदर्भात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.तब्बल दीड वर्षा नंतर ही बैठक झाली असून या बैठकीत अनेक निर्णय झाले आहेत.
बैठक जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.बैठकीस समितीचे सभासद राम आपटे, राजा भाऊ पाटील दिनेश ओऊळकर,सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर सचिव सौ.सुजाता सौनिक, वकील शिवाजी राव जाधव संतोष काकडे उपस्थित होते.
या बैठकीत काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले .पुढील बैठक 8 जुलैच्याआधी घेण्यात येईल. बैठकीपूर्वी सर्व साक्षीदारांची प्रतिज्ञापत्रे अंतिम करण्यात येणार आहेत. दोन वरिष्ठ वकिलांची लवकरात लवकर नेमणूक करण्यात येऊन दिल्लीत मुख्यवकील हरिष साळवे यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे.
नकाशे तयार करण्याचं कामही महिनाभरात पूर्ण करण्यात येईल. तज्ञ समितीची पुढील बैठक दिल्लीत घेण्यात येणार आहे. बैठकीत काही काळ आमदार श्री रोहित पवार उपस्थित होते.