Wednesday, April 17, 2024

/

मुख्यमंत्र्यांच्या हजेरीत विधान परिषदेसाठी खलबते

 belgaum

कर्नाटक वायव्य पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगावात आज शनिवारी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अध्यक्षतेखाली भाजपची सभा पार पडली. सभेस भाजपातील आघाडीच्या नेत्यांनी हजेरी लावली होती.

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री उमेश कत्ती यांच्या शहरातील युके 27 हॉटेलमध्ये मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनता पक्षाच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला जल संसाधन मंत्री गोविंद कारजोळ, माजी मंत्री रमेश जारकीहोळी, माजी उपमुख्यमंत्री व एमएलसी लक्ष्मण सवदी, खासदार मंगल अंगडी, राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी, आमदार पी. राजीव, आमदार ॲड. अनिल बेनके, माजी आमदार संजय पाटील आदींसह अनेक नेते मंडळी उपस्थित होती. सभेमध्ये विधान परिषद निवडणुकीत भाजप उमेदवारांना निवडून आणण्याचा संकल्प करण्यात आला.

सभेनंतर प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले, गेल्या दहा-बारा दिवसांपासून पक्षनेते प्रचारात गुंतले होते. त्यांच्याकडून सर्व तालुक्यातील परिस्थितीचा आढावा आजच्या सभेत घेण्यात आला. त्याचप्रमाणे विजापूर व बागलकोट जिल्ह्यातील वातावरणाचीही माहिती घेण्यात आली.

 belgaum

मतदारांचा प्रतिसाद पाहता भाजपचे अरुण शहापूर व हनुमंत निराणी यांचा विजय निश्चित आहे. प्रचंड बहुमताने ते निवडून येतील यात शंका नाही. निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत. संबंधित सर्व जिल्ह्यातील सर्व जाती धर्माच्या मतदारांनी आम्हाला पाठिंबा व्यक्त केला आहे. बेळगाव, विजापूर व बागलकोट या तीनही जिल्ह्यातील सर्व संस्थांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे असे सांगून निवडणूक निकाल आदिवशी आमची रणनीती सर्वांना कळेल, असे मुख्यमंत्री बोम्मई यांनी सांगितले.Cm meeting

भाजपमधील मतभेदाबाबतच्या प्रश्‍नाला उत्तर देताना त्यांनी आमच्यात कसलेही मतभेद नाहीत असे स्पष्ट केले. वायव्य शिक्षक मतदार संघात कडवी लढत होणार का? या प्रश्नावर कडवी, जटिल लढत वगैरे कांही नाही.

आधी कांही अडचणी होत्या हे खरे, मात्र गेल्या 12 दिवसांच्या प्रचार काळात बहुसंख्य शिक्षण संस्था, शिक्षक संघांनी आम्हाला उत्स्फूर्त पाठिंबा दिला आहे. त्यामुळे गेल्या वेळेपेक्षाही विक्रमी मतांनी अरुण शहापूर विजय होतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. एकंदर विधान परिषद निवडणूक जिंकायची असा निर्धार करून भाजपने रणनीती आखली असली तरी त्यात त्यांना कितपत यश येते हे निकाला दिवशीच स्पष्ट होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.