बेळगाव सुवर्णसौध समोर कंत्राटी तत्वावर कार्य करणाऱ्या मल्लम्मा नामक महिलेने शेवया वळत घातल्या आणि पाहता पाहता यासंदर्भातील फोटो प्रचंड व्हायरल झाला. यावरून अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त करत मल्लम्माच्या बाजूने उभं राहण्याचा प्रयत्न केला.
याच प्रकारावर माहिती हक्क कार्यकर्ते भीमाप्पा गडाद यांनी एक व्हिडीओ प्रसारित करून घडल्या प्रकाराबाबाबत नाराजी आणि संताप व्यक्त केला आहे.
सुवर्णसौधसमोर कडेकोट बंदोबस्त असूनदेखील असा प्रकार घडला हि बाब संपूर्ण राज्यासाठी लाजिरवाणी असून याचा तपास घेऊन संबंधितांवर कारवाई होणे आवश्यक असल्याचे गडाद यांनी व्हिडिओत म्हटले आहे. शिवाय सुवर्णसौंधची अनेक पोलिसांचीही नियुक्ती करण्यात आली असून सुरक्षेत कमकुवतपणा दिसून आल्याने पोलिसांवर देखील कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
४०० कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या सुवर्णसौधमध्ये असंख्य पोलीस, अधिकारी, कर्मचारी कार्यरत असूनही असा प्रकार घडला हि बाब लाजिरवाणी तर आहेच परंतु इतकी सुरक्षा असूनही सदर महिला आत कशी गेली? तिला आत जाण्याची परवानगी कुणी दिली?
कि यावेळी याठिकाणी कोणी उपलब्धच नव्हते? असे सवाल गडाद यांनी उपस्थित करत प्रवेशद्वाराकडे सुरक्षेची जबाबदारी देऊन तैनात करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासून माहिती हक्क अंतर्गत माहिती जमा करण्यात येन न्यायालयीन लढा देण्याची तयारी गडाद यांनी दाखविली आहे. तसेच घडल्या प्रकाराबाबत पोलिसांना दोषी ठरवत कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही दिला आहे.