दुपदरीकरणाचे काम पूर्ण झालेल्या बेळगाव ते सुळधाळ दरम्यानच्या रेल्वेमार्गावर स्पीड ट्रायलद्वारे ताशी 120 कि. मी. वेगाने करण्यात आलेली पाहणी यशस्वी झाली असून लवकरच हा रेल्वे मार्ग सेवेत दाखल होणार आहे.
मिरज ते लोंढा यादरम्यान केल्या जात असलेल्या रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यादरम्यान बेळगाव विभागातील सध्या बेळगाव ते सुळधाळ या सुमारे 27 कि. मी. अंतराच्या रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण पूर्ण झाले आहे.
गेल्या सोमवार व मंगळवारी दोन दिवस या मार्गावर स्पीड ट्रायल व बेंगळूर येथील विशेष पथकाकडून मोटार ट्रॉली इन्स्पेक्शन करण्यात आले. ताशी 120 कि. मी. वेगाने नव्या मार्गावरून इंजिन धावले. स्पीड ट्रायल यशस्वी झाल्यानंतर आता एक्सप्रेस रेल्वे मार्गावरून धावणार आहेत.
गेल्या महिनाभरापूर्वी बेळगाव ते देसुरदरम्यान सुमारे 12 किमी अंतराच्या रेल्वे मार्ग दपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. या रेल्वे मार्गाची देखील पाहणी करण्यात आली होती. त्यानंतर चार दिवसातच या रेल्वे मार्गावरून रेल्वे धावली. त्यामुळे बेळगाव ते सुळधाळ दरम्यानच्या या नव्या रेल्वे मार्गावरून देखील लवकरच रेल्वे धावणार आहे.
रेल्वेंची गती वाढावी व प्रवासाचा कालावधी कमी व्हावा यासाठी रेल्वे मार्गांचे दुपदरीकरण केले जात आहे. त्यामुळे क्रॉसिंगसाठी कुठेही रेल्वे थांबणार नाही दुपदरीकरणामुळे रेल्वे वाहतुकीचे होणारे कोंडी तसेच एका रेल्वेमुळे दुसऱ्या रेल्वेला करावी लागणारी प्रतीक्षा मिटणार आहे.