बेळगाव जिल्ह्याचे पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांच्या बदलीचा आदेश राज्य सरकारने बजावला आहे. राज्यातील 16 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा आदेश राजकारण सरकारने बजावला असून त्यात बेळगाव जिल्ह्याचे एसपी लक्ष्मण निंबरगी यांचादेखील समावेश आहे
आय पी एस अधिकारी संजीव एम पाटील यांची बेळगाव जिल्ह्याच्या एस पी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
बेंगळुरू शहराच्या पश्चिम विभागाचे पोलीस आयुक्त संजीव एम पाटील हे सेवा बजावत होते त्यांची बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख पदी नियुक्ती झाली आहे.
गेल्या दोन वर्षाहून अधिक काळापासून निंबरगी हे बेळगाव जिल्ह्याचे एस पी म्हणून कार्यरत होते कोरोना काळामध्ये रुग्णांना मदत करण्यासाठी निंबरगी यांनी अनेक मदतीची कामे केली होती त्यामुळे ते विशेष चर्चेत आले होते आता दोन वर्षाहून अधिक काळ बेळगावात सेवा झाल्यानंतर त्यांची बदली अन्यत्र झाली आहे.