केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने 2018 -19 आणि 2019 -20 या कालावधीतील देशभरातील जिल्ह्यांच्या शिक्षणातील कामगिरीच्या निर्देशांकांची वर्गवारी (पीजीआय -डी) जाहीर केली आहे.
सर्व समावेशक विश्लेषणाद्वारे निर्देशांक तयार करून जिल्हास्तरावर शालेय शिक्षण व्यवस्थेतील गुणवत्ता सुधारणा कामगिरीचे मूल्यमापन करण्यात आले आहे. या अहवालात चित्रदुर्ग, बेळगाव आणि धारवाड जिल्ह्याला ‘अतिउत्तम’ दर्जा मिळाला आहे.
गुणवत्ता वाढ निर्देशांक (पीजीआय) या तुलनेने नवीन निर्देशांकाद्वारे राज्यातील शाळांच्या शैक्षणिक गुणवत्ता प्रगतीचे मूल्यमापन केले जाते. केंद्रीय शालेय शिक्षण आणि साक्षरता खात्याने आतापर्यंत देशातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे 2017 -18 ते 2019 -20 पीजीआय अहवाल जाहीर केले आहेत.
देशातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या शिक्षणातील साक्षेप कामगिरीचे मुल्यांकन करण्याचा पीजीआयचा उद्देश सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांना आपली कामगिरी उंचावण्यासाठी प्रोत्साहन देणे हा आहे.
शालेय शिक्षण क्षेत्रात उत्प्रेरक परिवर्तन आणण्यासाठी पीजीआय हे संकल्पनात्मक साधन आहे. इच्छित इष्टतम शिक्षण परिणामांसाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना बहुआयामी हस्तक्षेपासाठी प्रवृत्त करणे हे देखील पीजीआयचे उद्दिष्ट आहे.
अत्युत्तम कामगिरी बजावणाऱ्या राज्यांच्या सर्वोत्तम पद्धतीचा अवलंब करण्यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना प्रेरित करण्याचे कार्यही पीजीआय करत असते. पीजीआय -डीमध्ये सर्वोच्च वर्ग हा 90 टक्क्यांहून अधिक निर्देशांकांचा असतो, 71 ते 80 टक्के निर्देशांक असलेला वर्ग ‘अतिउत्तम’ तर 61 ते 70 टक्के निर्देशांक हा ‘उत्तम वर्ग’ असतो.