परवाना अनिवार्य करून व्यापाऱ्यांना त्रास देऊ नका अश्या सक्त सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी बेळगाव मनपाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
व्यापाऱ्यांनी कुठून परवाना घ्यायचा आहे हे व्यापाऱ्याने ठरवायचे आहे, त्यांना मनपा मधूनच परवाना घ्यावा हे अनिवार्य करू नका अशी भूमिका घेत जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) विभागा कडूनही परवानगी मिळवू शकतात असे म्हटले आहे.
बेळगावचे जिल्हाधिकारी हे ब शहर महानगरपालिकेचे प्रशासक देखील आहेत, यांनी शहर महानगरपालिकेत घेतलेल्या आढावा बैठकीत मनपा अधिकाऱ्यांना याबाबतीत सूचना दिल्या आहेत.
बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने या वर्षाच्या सुरुवातीला व्यापार परवान्यांचा मुद्दा उचलून धरला होता आणि छोट्या व्यापाऱ्यांना दिलासा देण्याची मागणी केली होती.
MSME मंत्रालयाने 2 जुलै 2021 रोजी जारी केलेल्या अधिकृत मेमोद्वारे व्यापार्यांना उद्यम पोर्टलवर नोंदणी करण्याची परवानगी दिली. त्यामुळे आता हे स्पष्ट झाले आहे की एकतर एमएसएमई नोंदणी किंवा सिटी कॉर्पोरेशनकडून व्यापार परवाना मिळू शकतो.
तसेच मार्चमध्ये एका बैठकीत व्यापाऱ्यांना सांगितल्याप्रमाणे ऑनलाइन नूतनीकरण होत नाही. एका व्यापार्याने बेळगाव live ला सांगितले की, त्याने 7 एप्रिल 2022 रोजी या वर्षासाठी नूतनीकरणासाठी अर्ज केला होता, परंतु आजपर्यंत काहीही झाले नाही आणि स्थिती दर्शवते की तुमचा अर्ज ऑपरेटर (ऑपरेटर) सोबत एंडोर्समेंट टप्प्यात आहे. त्यामुळे ऑनलाइन नूतनीकरण देखील ठप्प झाले आहे, असेही त्यांनी नमूद केले.