खाजगी पथसंस्थेत अटेंडर म्हणून काम करणाऱ्याच्या मुलीने बारावीच्या परीक्षेत 96 टक्के गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे.
श्रुती सुनील बायाणाचे हिने 600 पैकी 571 गुण मिळवताना गणित आणि जीवशास्त्र विषयात 100 पैकी 100 गुण मिळवले आहेत.
श्रुती ही जी एस एस कॉलेजची विद्यार्थीनी आहे तिचे वडील सुनील हे बायाणाचे हे नवहिंद पतसंस्थेत अटेंडर म्हणून काम करतात जुनेबेळगावचे रहिवाशी आहेत.
श्रुतीच प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मराठी माध्यमातून गोमटेश शाळेत झाले असून दहावीत देखील तिने 96 टक्के गुण मिळवले होते. मध्यमवर्गीय कुटुंबातील या मुलीने बारावी परीक्षेत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मिळविलेल्या यशा बद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.