केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेचा निषेध करत विरोधी पक्ष विनाकारण आंदोलनं करून संपूर्ण देशाला भडकविण्याचे काम करत आहे. हे सर्व थांबले पाहिजे, असे विचार बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी व्यक्त केले.
बेळगावमध्ये आज शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आमदार ॲड. अनिल बेनके यांनी सर्वप्रथम विरोधी पक्षाने अग्निपथ योजना काय आहे हे नीट समजून घ्यावे. युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आपल्या केंद्र सरकारने ही एक उत्तम योजना जारी केली आहे.
युवा पिढीने ही योजना समजून घेऊन तिचा लाभ घेतला पाहिजे. तथापि असे न करता विरोधी पक्ष आंदोलने छेडून युवा पिढीला भडकावण्याचे कार्य करत आहे असे सांगून
आगामी काळात देशातील बेरोजगारीची समस्या मोठ्या प्रमाणात हटविण्याचे कार्य केले जाईल, असा विश्वासही आमदार ॲड. बेनके यांनी व्यक्त केला. पत्रकार परिषदेस खासदार मंगल अंगडी, एम. बी. जिरली आदींसह अन्य भाजप नेते उपस्थित होते.