Saturday, September 7, 2024

/

एसीबीची व्यापक मोहीम; एकाच वेळी 80 ठिकाणी धाडी!

 belgaum

एसीबी अर्थात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने आज शुक्रवारी सकाळी राज्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरुद्ध व्यापक मोहिम उघडताना 21 सरकारी अधिकाऱ्यांची घरं आणि कार्यालयं अशा 80 ठिकाणी एकाच वेळी धाडी टाकून कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे.

एसीबीच्या या धाड सत्रामध्ये 300 अधिकारी आणि कर्मचारी सहभागी आहेत. एकाच वेळी 80 ठिकाणी टाकण्यात आलेल्या धाडीप्रसंगी संबंधित अधिकाऱ्यांच्या चौकशीसह त्यांचे घर आणि कार्यालयातील कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. ज्या अधिकाऱ्यांच्या घरं आणि कार्यालयावर धाडी टाकण्यात आल्या आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत.

1) भीमराव वाय. पवार अधीक्षक अभियंता बेळगाव, 2) हरीश, सहाय्यक अभियंता लघुपाटबंधारे उडपी, 3) रामकृष्ण एच. व्ही. सहाय्यक कार्यकारी अभियंता लघुपाटबंधारे हासन, 4) राजीव पुरषय्या नायक, सहाय्यक अभियंता सार्वजनिक बांधकाम खाते कारवार, 5) बी. आर. बोपय्या कनिष्ठ अभियंता पोन्नमपेट जिल्हा पंचायत, 6) मधुसूदन, जिल्हा रजिस्ट्रार आयजीआर ऑफिस बेळगाव,

7) परमेश्वरप्पा सहाय्यक अभियंता लघुपाटबंधारे हुविनदगली, 8) यल्लाप्पा एन. पडसली आरटीओ बागलकोट, 9) शंकरप्पा नागप्‍पा गोगी, प्रकल्प संचालक निर्मिती केंद्र बागलकोट, 10) प्रदीप एस. अलुर, पंचायत द्वितीय दर्जा सचिव आरडीपीआर गदग, 11) सिद्धाप्पा टी., उपमुख्य वीज अधिकारी बेंगळूर, 12) तिप्पांना पी. सिरसगी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी बिदर, 13) मृत्युंजय चिन्नबसय्या तिरानी, सहायक नियंत्रक कर्नाटक पशुपालन पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ बिदर, 14) मोहन कुमार, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग चिकबेळ्ळापूर जिल्हा,

15) श्रीधर, जिल्हा निबंधक कारवार 16) मंजुनाथ जी., निवृत्त कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम खाते 17) शिवलिंगय्या, ग्रुप सी बीडीए, 18) उदय रवी पोलीस निरीक्षक कोप्पळ, 19) बी. जी. तिमय्या, केस वर्कर कडुर नगरपालिका, 20) चंद्रप्पा सी. होळकर, युपीटी ऑफिस राणीबेन्नूर 21) जनार्दन, निवृत्त निबंधक (भू मूल्यांकन).

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.