अलारवाड येथे 24 तास पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पाईप लाईन घालण्याच्या कामाचा शुभारंभ कार्यक्रम आज गुरुवारी सकाळी उत्साहात पार पडला.
प्रमुख पाहुणे बेळगाव महापालिकेच्या प्रभाग क्र. 48 चे नगरसेवक बसवराज मोदगेकर यांनी जेसीबी यंत्राचे पूजन करून श्रीफळ वाढवण्याद्वारे 24 तास पाणीपुरवठा योजनेच्या पाईप लाईन घालण्याच्या कामाचा शुभारंभ केला.
याप्रसंगी समाजसेवक परशराम बेडका, भरमा शंकरगौडा, सुरेश मुतगेकर, सुनील गिरी, माजी नगरसेवक शांतीनाथ बुडवी, बाहुबली जीनगौडा, भीम बुडवी, एल अँड टी कंपनीचे अभियंता सुहास कामत, संनी नेतलकर,
बबन मोदगेकर आदींसह गावातील नागरिक व अधिकारी उपस्थित होते. पाईपलाईन घालण्याचे हे काम पूर्ण झाल्यानंतर 24 तास पाणीपुरवठा योजनेमुळे अलारवाड गावातील पाण्याची समस्या मिटणार असल्यामुळे नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.