Saturday, December 7, 2024

/

शिवजयंती मिरवणूक : वाहतुकीच्या मार्गात बदल

 belgaum

बेळगावातील शिवजयंती चित्ररथ मिरवणूक यंदा संपूर्ण जल्लोषात निघणार आहे. ही मिरवणूक शांततेत व सुरळीत पार पडावी यासाठी बेळगाव पोलिस प्रशासनाकडून सर्व ती खबरदारी घेऊन उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने शहरातील विविध रस्त्यांवरील वाहतूक सोयीस्कर मार्गाने वळविण्यात येणार आहे.

शहरातील शिवजयंती चित्ररथ मिरवणूक येत्या बुधवार दि. 4 मे रोजी काढण्यात येणार आहे. यासाठी त्यादिवशी शहरातील विविध मार्गांवरील वाहतूक पुढील प्रमाणे वळविण्यात आली आहे. 1) कित्तूर चन्नम्मा सर्कल कॉलेज रोड मार्गे खानापूर रोडकडे जाणारी वाहतूक चन्नम्मा सर्कल श्री गणेश मंदिराच्या मागील बाजूने क्लब रोड, म. गांधी सर्कल, अरगण तलाव, शौर्य चौक, केंद्रीय विद्यालय क्र. 2, शर्कत पार्क, ग्लोब थिएटर सर्कल या मार्गाने खानापूर रोड.

2) जिजामाता सर्कलपासून देशपांडे पेट्रोल पंप, नरगुंदकर भावे चौक कंबळी खूट, पिंपळ कट्टा, पाटील गल्ली या मार्गावरून जाणाऱ्या सर्व वाहनांची वाहतूक जिजामाता सर्कल मार्गे जुना पी. बी. रोडवर वळविण्यात आली आहे. 3) मिरवणूक संबंधित मार्गावरील म्हणजे नरगुंदकर भावे चौक, मारुती गल्ली, हुतात्मा चौक, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, कॉलेज रोड, धर्मवीर संभाजी चौक, रामलिंग खिंड गल्ली, टिळक चौक, हेमू कलानी चौक, शनी मंदिर, कपिलेश्वर ओव्हर ब्रिज, कपिलेश्वर मंदिर या दोन्ही रस्त्यांवरील वाहतूक बुधवारी दुपारी 2 वाजल्यापासून शिवजयंती चित्ररथ मिरवणूक समाप्त होईपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे.

4) नाथ पै सर्कलकडून बँक ऑफ इंडिया मार्गे कपिलेश्वर ब्रिजकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना एसपीएम रोड, भातकांडे स्कूल क्रॉस गल्ली अर्थात कपिलेश्वर कॉलनीतून बाहेर जावे लागेल. जुना पी. बी. रस्ता, व्हीआरएल लॉजिस्टिक्स, भातकांडे स्कूल या मार्गावरील कपिलेश्वर ओव्हर ब्रिज मार्गावरून जाणाऱ्या सर्व वाहनांना भातकांडे स्कूल क्रॉसनजीक असलेल्या शिवाजी गार्डन, बँक ऑफ इंडिया क्रॉस, महात्मा फुले रोड या मार्गावरून जावे लागेल.Traffic diversion

जुना पी. बी रोड यश हॉस्पिटल, महाद्वार रोड, कपिलेश्वर मंदिर, रेल्वे ओव्हर ब्रिजकडून जाणाऱ्या सर्व वाहनांना यश हॉस्पिटलवरून भातकांडे स्कूल, तानाजी गल्ली रेल्वे गेट मार्गे जावे लागेल. गुड्स शेड रोड कपिलेश्वर ओव्हर ब्रिज मार्गे जाणाऱ्या सर्व वाहनांना एसपीएम रोड, मराठा मंदिर, गोवावेस सर्कल या मार्गाने जावे लागेल.

खानापूर रस्ता अर्थात खानापूर रोड, बीएसएनएल ऑफिस क्रॉस, स्टेशन रस्ता, गोगटे सर्कल या मार्गावरून रेल्वे स्टेशन, हेड पोस्ट ऑफिस सर्कल, शनी मंदिर येथून जाणाऱ्या सर्व वाहनांना ग्लोब सर्कलपासून फिरून शर्कत पार्क, केंद्रीय विद्यालय क्र. 2, शौर्य चौक, म. गांधी सर्कल, क्लब रोड, चन्नम्मा सर्कल या मार्गावरून जावे लागेल. तरी सर्व वाहनचालकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.