लोंढा ते मिरज दरम्यानच्या 186 कि. मी. रेल्वे मार्गापैकी बेळगाव ते देसूरसह एकूण 56 कि. मी. अंतराच्या रेल्वे मार्गाचे दुपदरीकरणाचे काम म्हणजे 30 टक्के काम पूर्ण झाले आहे.
रेल्वे मार्ग दुपदरीकरणच्या कामाबरोबरच बेळगाव रेल्वे स्थानक येथे अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टिम देखील बसविण्यात आली आहे.
दरम्यान, बेळगाव ते देसूर दरम्यानच्या 10.8 कि. मी. अंतराच्या रेल्वे मार्ग दुपदरीकरणाचे काम पूर्ण झाले असून या मार्गाची नैऋत्य रेल्वेचे सुरक्षा आयुक्त अभयकुमार राय यांनी काल बुधवारी स्पेशल ट्रेनद्वारे स्पीड ट्रायल (चांचणी) घेतली.
ताशी 120 किलोमीटर वेगाने नव्याने तयार करण्यात आलेल्या दुपदरीमार्गाची चांचणी घेण्यात आली. याप्रसंगी हुबळीचे डीआरएम अरविंद मालखेडे, चीफ ॲडमिनिस्ट्रेटर ऑफिसर देशरतन गुप्ता, जयपाल सिंग तसेच अन्य रेल्वे अधिकारी उपस्थित होते.