Friday, January 24, 2025

/

स्विमिंग पूल मध्ये मारलेला ‘सूर’ जीवावर बेतला

 belgaum

पाण्यात स्विमींग पूल मध्ये मारलेला सुर एका युवकाच्या जीवावर बेतला असून सूर मारल्या नंतर डोकीला जबर मार लागून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.बेळगाव शहरातील हनुमान नगर भागांत ही घटना घडली आहे.

17 वर्षीय युवकाचा डोक्याला मार लागून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी बारा वाजता हनुमान नगर येथे घडली आहे. गुरुदेव सिंग, राहणार कमांडो क्वाटर्स  कॅम्प बेळगाव असे त्या युवकाचे नाव आहे.

गुरुदेव सिंग हा उन्हाळी सुट्टी सत्कारणी लावावी या हेतूने हनुमान नगर येथील जलतरण तलावात पोहोण्याच्या सरावासाठी जात होता.

रोजच्याप्रमाणे तो पोहण्यासाठी गेला होता. काहीवेळ पोहण्याचा आनंद घेतल्यानंतर तो सूर मारण्यासाठी बारा फूट उंचीवर असणाऱ्या फळीवर गेला आणि तेथून त्याने पाण्यात सूर मारला. यावेळी त्याच्या डोकीला मार लागून गंभीर दुखापत झाली आणि त्याचा मृत्यू झाला.या आदरणीय एपीएमसी पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

सध्या गर्मी वाढली आहे त्यात  शाळांना उन्हाळी सुट्टी सुरू आहे अनेक स्विमिंग पूल हाऊस फुल्ल झाली आहेत अश्या वेळी पोहतेवेळी काळजी घेणे गरजेचे आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.