संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यानिमित्त येत्या शुक्रवार दि. 10 जून 2022 रोजी सकाळी 9 वाजता शितोळे -अंकली ते श्री क्षेत्र आळंदीकडे माऊलींच्या अश्वाचे प्रस्थान होणार आहे.
शितोळे -अंकली येथील अंकलीकर राजवाड्यातून माऊलींच्या अश्वाचे प्रस्थान होणार असून याप्रसंगी समस्त ग्रामस्थ व पंचक्रोशीतील वारकरी व भाविकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन श्रीमंत सरदार कुमार महादजीराजे शितोळे सरकार -अंकलीकर आणि श्रीमंत सरदार उर्जितसिंगराजे शितोळे सरकार -अंकलीकर यांनी केले आहे.
माऊलींच्या अश्वाचे शुक्रवार दि. 10 जून रोजी सकाळी 9 वाजता अंकलीकर राजवाड्यातून प्रस्थान झाल्यानंतर पहिल्या दिवशी मांजरीवाडी येथे दुपारचे भोजन होईल, त्यानंतर कागवाड येथे विसावा घेतल्यानंतर अश्वाचा रात्रीचा मुक्काम मिरज येथे असेल.
या पद्धतीने मिरज, सांगली, सांगलीवाडी राम मंदिर, तुंग, कारंदवाडी, मिरजवाडी, इस्लामपूर पेठनाका, पेठनाका, नेर्ले, वहागाव, उंब्रज, भरतगाव, सातारा, नागेवाडी, उडतरे, भुईज, सुरूर, खंडाळा, सारोळा, हरिष्चंद्री, वरिये, शिंदेवाडी, कात्रज, पुणे, अलंकार टॉकीज तडकतवाडी, येरवडा, थोरल्या पादुका मार्गे आळंदी असा सोमवार दि. 20 जून 2022 पर्यंत माऊलींच्या अश्वांचा प्रवास असणार आहे. अश्वाचे चालक व व्यवस्थापक तुकाराम कोळी हे आहेत.