1 जून 1986 रोजी च्या कन्नड सक्ती विरोधी आंदोलनात शरद पवार यांनी बेळगाव सीमा लढ्याचे नेतृत्व केले होते.ते स्वतः बेळगावात आंदोलन करण्यासाठी दाखल झाले होते त्या रोजी शहरातील राणी चन्नमा चौकामध्ये आंदोलन केलं होतं त्या चौकाचा फोटोची फ्रेम बनवून त्यांना भेट देण्यात आली.
जवळपास पस्तीस वर्षापूर्वीचा जुनी फोटो फ्रेम त्यांना भेट दिली असता त्यांनी बेळगावबाबतच्या या जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि बेळगाव लढ्या विषयी चर्चा केली.
माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे मंगळवारी आणि बुधवारी दोन दिवस बेळगाव दौऱ्यावर आहेत.
मंगळवारी हिंदवाडी येथील दुपारी गोगटे यांच्या घरी भेट दिली असता महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते अमित देसाई यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांना त्या काळातला फोटो दाखवला त्या वेळी पवार आणि जुन्या आठवणींना उजाळा देत अमित देसाई यांच्याशी चर्चा केली. जुना फोटो पाहून पवार साहेब खुश झाले होते यावेळी विक्रांत होनगेकर उपस्थित होते.
मंगळवारी सायंकाळी चिकोडी आणली ते दोन कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर बुधवारी सकाळी मराठा को ऑप बँकेच्या अमृत महोत्सव कार्यक्रमात आणि त्यानंतर ज्योती कॉलेजच्या सुवर्ण महोत्सवी सांगता महोत्सवात सहभागी होणार आहेत त्यासाठी ते बेळगाव दौऱ्यावर आले आहेत दरम्यान महाराष्ट्र समितीचे देखील मंडळाची ते चर्चा करणार आहेत.