बेळगावात पत्रकार क्षेत्रात योगदान दिलेले निवृत्त जेष्ठ पत्रकार प्रशांत बर्डे यांना त्यांनी बजावलेल्या सेवेसाठी बेळगाव जिल्हा कार्यनिर्वाहक संघाच्या वतीनं सत्कार करण्यात आला.
जिल्हा कार्यनिर्वाहक संघाच्या वतीनं दर रविवारी एका जेष्ठ पत्रकाराचा सत्कार करण्यात येतो त्या अंतर्गत जिल्हा अध्यक्ष दिलीप कुरुंदवाडे यांनी सत्कार केला.
बेळगावात 35 वर्षे पत्रकारितेच्या क्षेत्रात योगदान दिलेल्या प्रशांत बर्डे यांनी रणझुंझार या मराठी दैनिकातून आपल्या पत्रकारितेची सुरुवात केली होती आणि पुढारी या मराठी दैनिकात सलग 23 वर्षे काम करत ब्युरो चीफ म्हणून सेवा निवृत्त झाले होते.बेळगावातील मराठी पत्रकारितेत दिलेल्या योगदानाबद्दल कार्यनिर्वाहक पत्रकार संघाने त्यांचे भाषा भेद विसरून सत्कार केला.
कार्यनिर्वाहक संघाचे अध्यक्ष दिलीप कुरुंदवाडे आणि सचिव अरुण पाटील यांनी त्यांचा सत्कार केला.बर्डे यांनी आपल्या पत्रकारितेत माजी एच डी देवेगौडा आणि माजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांच्या बातम्या देखील कव्हर केल्या होत्या.बेळगाव परिसरात अनेक बातम्या व राजकीय सामाजिक सांस्कृतिक जाण असलेल्या जाणत्या अभ्यासक पत्रकारां पैकी एक आहेत.
बर्डे सध्या आजारी असल्याने घरी विश्रांती घेत असतात कर्नाटक शासनाकडून निवृत्त पत्रकारांना मिळणारी पेन्शनची सवलत अद्याप मिळत नाही आहे ते या सुविधेपासून वंचित आहेत त्यांना शासनाची पेन्शन मिळवून देण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन यावेळी दिलीप कुरुंदवडे यांनी दिले.
पत्रकारितेच्या जीवनात त्याकाळी आपण कोणत्या पद्धतीने पत्रकारिता केली याचे अनुभव त्यांनी यावेळी कथन केले यावेळी पत्रकार प्रकाश बेळगोजी, रमेश हिरेमठ,कुंतीनाथ कलमनी,रवी उप्पार आदी उपस्थित होते.