कर्नाटक राज्यातील शाळा पुनश्च सुरू होण्यास उशीर होणार असल्याच्या अफवांचा इन्कार करताना प्राथमिक व माध्यमिक शिक्षण खात्याचे मंत्री बी. सी. नागेश यांनी ठरल्याप्रमाणे येत्या 16 मे 2022 पासूनच शाळा पुनश्च सुरू होतील, असे स्पष्ट केले आहे.
बेंगलोर येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. प्रलंबित अभ्यासक्रम भरून काढण्यासाठी वर्षभर कार्यक्रम राबविला जाईल. उत्तर भारतात उष्णतेची लाट आली असल्याच्या कारणास्तव शाळा पुनश्च सुरू केला जाऊ नये यासाठी राजकीय दबाव आणला जात आहे.
मात्र त्याकडे लक्ष देऊ नये असे शैक्षणिक संस्थांच्या संघटनांनी सरकारला विनंती केली आहे. प्रलंबित अभ्यासक्रम भरून काढण्यासाठीच्या कार्यक्रमाचा अवलंब करण्यास खाजगी शाळा देखील तयार असून या संदर्भातील शिक्षण संसाधने शिक्षण खात्याच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत असे मंत्र्यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे राज्यातील यंदाचा एसएसएलसी परीक्षेचा निकाल येत्या 19 मे 2022 रोजी जाहीर होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.