घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरामध्ये आज शनिवारपासून आणखी 50 रुपयाने वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे 14.2 किलोच्या प्रती घरगुती गॅस सिलेंडर मागे नागरिकांना 999.50 रुपये मोजावे लागणार आहेत.
एलपीजीच्या घरगुती गॅस सिलेंडर प्रमाणे व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात देखील वाढ करण्यात आली आहे. 19 किलो वजनाच्या व्यवसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या पूर्वीच्या 2355.5 रुपये किंमतीमध्ये आता 102 रुपयाने वाढ करण्यात आली आहे.
ए 5-किलो एलपीजी व्यवसायिक गॅस सिलेंडर किंमतीत देखील 655 रुपये इतकी वाढ झाली आहे. एकंदर गेल्या वर्षभरात घरगुती गॅस सिलेंडरच्या दरामध्ये सरासरी 200 रुपयांनी वाढ झाली आहे.