बेळगाव शहर परिसरात मे महिन्यात सर्वसामान्यपणे सरासरी 95 मि. मी. इतकी पावसाची नोंद होते, मात्र यंदा या महिन्यात आजतागायत म्हणजे अवघ्या 20 दिवसात 72 मि. मी. पाऊस नोंदवला गेला आहे.
बेळगाव सरकारी विश्राम धाम याठिकाणी असलेल्या पर्जन्यमापन उपकरणात मे महिन्यात सर्वसाधारणपणे सरासरी 95 मि. मी. पावसाची नोंद होते.
यंदा मात्र गेल्या कांही दिवसापासून सतत पडणाऱ्या पावसामुळे आज शुक्रवारी 20 मेपर्यंत याठिकाणी 72.0 मि. मी. पाऊस नोंदवला गेला आहे.
त्याच प्रमाणे बेळगाव शहरानजीकच्या बागेवाडी येथे आत्तापर्यंत 90.6 मि. मी., देसूर येथे 62.8 मि. मी., काकती येथे 74.4 मि. मी., संतीबस्तवाड येथे 62.0 मि. मी., सुळेभावी येथे 67.8 मि. मी. आणि उचगाव येथे 60.9 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.