Saturday, January 4, 2025

/

नूतन जिल्हाधिकारी झाले कामावर रुजू!

 belgaum

बेळगावचे नूतन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी आज गुरुवारी सायंकाळी आपल्या अधिकार पदाची सूत्रे हाती घेतली आहेत. मावळते जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी आपल्याकडील पदभार नितेश पाटील यांच्याकडे सुपूर्द केला.

जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज गुरुवारी सायंकाळी बेळगावचे मावळते जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी नुतन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांचे प्रथम पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर आपल्याकडील पदभार त्यांच्याकडे सुपूर्द करून शुभेच्छा दिल्या. एम. जी. हिरेमठ यांची सरकारने बेंगलोर येथे व्यवस्थापकीय संचालकपदी बदली केली आहे.

dc nitesh

बेळगावचे नूतन जिल्हाधिकारी नितेश पाटील हे मूळचे सिंदगी (जि. विजापूर) तालुक्यातील केरूतगी गावचे आहेत. त्यांनी विजयपुरा येथे एसएसएलसी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर एनयुसी अलाहाबाद येथे संगणक विज्ञान विषयात बीएससी पदवी प्राप्त केली. पुढे सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कांही काळ काम केल्यानंतर 2012 मध्ये त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची (युपीएससी) परीक्षा दिली आणि भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाले. प्रारंभीच्या प्रोबेशनरी कालावधी त्यांनी बेळ्ळारी जिल्ह्यातील कुडलिगी आणि हगरिबोम्मनहळ्ळी तहशील येथे काम केल्यानंतर शिमोगा जिल्ह्यातील मरीनचे उपविभागीय अधिकारी म्हणून काम केले. त्यानंतर त्यांची चित्रदुर्ग जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. पुढे वाणिज्य कर विभागाचे आयुक्त म्हणून देखील त्यांनी काम केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.