Sunday, December 22, 2024

/

कंटेनरने कारला चिरडले-चार ठार

 belgaum

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर तवंदी घाटात उतारावरील हॉटेल अमर समोर धोकादायक वळणावर भरधाव कंटेनरने कारला चिरडले. या भीषण अपघातात कारमधील जारजण जागीच ठार झाले आहेत. हे सर्वजण लग्नासाठी चालले होते. मृतांमध्ये मुलीचा भाऊ, काका, काकू, आजी यांचा समावेश आहे.

घटनास्थळा वरून मिळालेल्या माहितीनुसार अपघात (शुक्रवार) सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास झाला. छाया आदगोंडा पाटील (वय 55 ), आदगोंडा बाबू पाटील (वय 55,) महेश देवगोंडा पाटील (वय 23,) चंपाताई मगदूम (वय 80) रा. बोरगाववाडी ता. निपाणी अशी मृत चौघांची नावे आहेत.

कंटेनर चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे.
या अपघाताची भीषणता इतकी होती की कंटेनरच्या धडकेत कारमध्ये अडकून पडलेल्या चार जणांना पोकलेनच्या साह्याने बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते. अपघातानंतर तासभर मृतदेह कारमध्ये अडकून पडले होते.Nipani accident

अपघातातील मृत सर्वजण स्तवनिधी येथे मंगल कार्यालयात लग्नकार्यासाठी जात होते. अपघातामध्ये नवरी मुलगीच्या महेश या भावाचा समावेश आहे.

दरम्यान, घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, डीएसपी बसवराज यलीगार, सीपीआय संगमेश शिवयोगी, उपनिरीक्षक कृष्णवेनी गुर्लहेसूर यांच्यासह अग्निशमन विभागाने भेट देऊन मदत कार्य सुरू केले होते. निपाणी पोलीसात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.