सकल मराठा समाजाच्या गुरुवंदना कार्यक्रमाच्या नियोजनाची बैठक येळूरच्या चांगळेश्वरी मंदिरात ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.माजी ग्रामपंचायत सदस्य राजू पावले यांनी येळळूरमध्ये मोटारसायकल रॅली काढून जनजागृती करणार असल्याचे सांगितले त्याचबरोबर मराठा समाजातील प्रत्येक घटकाने आपला कार्यक्रम समजून सामील होण्याचे आवाहन केले.
गुणवंत पाटील यांनी इतिहास समजून घेतला तर वर्तमान आणि भविष्यकाळ उज्वल करता येतो. असे सांगून समाजाने हिरीरीने सहभागी व्हावे असे मत मांडले.मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण मराठा समाजाला एकत्र करून कार्य करणार असल्याचे सांगून एकंदर कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला.
चंद्रकांत कोंडुस्कर यांनी हे राजांचे कार्य आहे. या कार्यात समाजातील प्रत्येक घटक आत्मीयतेने सामील होईल असा विश्वास व्यक्त केला.महादेव पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जपणे हे आमच्या सर्वांचे कर्तव्य आहे ते निष्ठेने पार पाडू असा आशावाद व्यक्त केला.अध्यक्ष सतीश पाटील यांनी मोठ्या संख्येनी येळळूर मधील कार्यकर्ते सहभागी होतील अशी ग्वाही दिली.
आजच्या बैठकीत विनोद पाखरे, शुभम जाधव, राहुल कुगजी, मंथन खादरवाडकर, श्री मास्तमार्डी, राहुल अष्टेकर, दीपक कुगजी, योगेश टक्केकर, सूरज तम्मुचे, चांगदेव धामणेकर यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.