पुढील महिन्यात होणाऱ्या विधान परिषदेच्या वायव्य पदवीधर व वायव्य शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी मद्यविक्री बंदीचा आदेश जारी केला आहे.
वायव्य पदवीधर व वायव्य शिक्षक मतदार संघ निवडणुकीचे मतदान 13 जून रोजी होणार असून 15 जूनला मतमोजणी आहे. ही प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडावी यासाठी 11 जून रोजी दुपारी 4 वाजल्यापासून 13 जून रोजी रात्री 12 वाजेपर्यंत,
तसेच 15 जून रोजी सकाळी 6 वाजल्यापासून 16 जून रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत जिल्ह्यातील मद्यविक्रीची दुकाने, बियर बार बंद ठेवावेत असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बजावला आहे.
तसेच या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.