खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने सीमाप्रश्नाबाबत खानापुरातील काही समितीच्या सदस्यांनी मांडलेल्या सन 1993 चा तोडगा याबाबत खुलासा करण्या बाबत मध्यवर्ती समितीला निवेदन दिले आहे.
खानापूर घटक समितीने मध्यवर्तीला दिलेले निवेदन असे-बेळगाव येथे बुधवार दिनांक 11 मे 2022 रोजी विविध संस्था कडून महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय कृषिमंत्री श्री शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी बेळगाव येथे त्यांनी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती बरोबर सीमाप्रश्नी न्यायालयीन लढ्या संदर्भात पुढील रणनीती व वाटचाली संदर्भात चर्चा केली, पण याच वेळी खानापूर समितीतील काही सदस्यांच्या स्वयंघोषित शिष्टमंडळाने खा. शरद पवार यांची भेट घेऊन 1993च्या तोडग्याला चालना मिळावी अशी मागणी करणारे निवेदन दिले अशी फोटोसह बातमी एका वर्तमान पत्रात दिनांक 12 मे व 13 मे रोजी छापून आली . यासंदर्भात मध्यवर्ती म. ए. समितीशी बांधीलकी जपणाऱ्या खानापूर तालुका म. ए. समितीची भूमिका स्पष्ट आहे.
सदर बातमीचा व शिष्टमंडळाचा खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचा कोणताही संबंध नसून ही मागणी सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयातील मूळ दाव्याला छेद देणारी आहे असं मत आहे याबाबत खानापूर तालुका म.ए समितीचं नाव वापरून जनतेच्या मनात संभ्रम निर्माण केला जात आहे, ते होऊ नये असे आम्हाला वाटते.
तसेच गेले दोन ते तीन महिने खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती व सन 2018च्या निवडणुकीत समिती पासून विभक्त झालेल्या गटामध्ये एकीकडे प्रयत्न सुरू असताना काही मुद्यावर एकमत व खुलासा होण्यासाठी प्रयत्न सुरू होते, त्यात
१.सचिव गोपाळराव देसाई ,माजी आमदार दिगंबर पाटील व नारायण कापोलकर यांच्यावर डिपॉझिट संदर्भात श्री.आबासाहेब दळवी व श्री रूक्मान्ना झुंजवाडकर यांनी जो दावा दाखल केला होता तो बिनशर्त मागे घेणे .
२.काही महिन्यापूर्वी विभक्त गटाकडून मध्यवर्ती बरखास्त अशी खोडसाळ भूमिका अनेक वेळा मांडली होती त्याचा खुलासा घेणे,
३. सन 1993 च्या तोडग्याच्या मागणी संदर्भात व व्यवहार्यत बाबत खुलासा घेणे.
४.मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली पुढील लढ्याला बळकटी देण्यासाठी प्रयत्न करणे,
५.सीमाप्रश्नी न्यायालयीन लढ्याला बाधा पोहोचेल अशी कोणतीही मागणी न करणे.
6. खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समिती ही तालुका महाराष्ट्र समितीची संलग्न संघटना असून त्या माध्यमातून युवकांना समितीत सामावून घेण्यासाठी प्रयत्न करणे.
यासंदर्भात विभक्त गटाने गेल्या तीन संयुक्त बैठकांमध्ये कोणताही खुलासा अथवा आपली भूमिका मांडली नाही व एकीची प्रक्रिया पूर्ण न करताच आततायीपणा करत कुप्पटगिरी येथे सभा घेतली व त्या सभेत बेळगाव हून कांही मंडळी निमंत्रित होती . या हस्तक्षेपामुळे एकीची प्रक्रियेत कुठे ना कुठे खीळ बसताना दिसत आहे . या कारणास्तव , महाराष्ट्र एकीकरण समितीच्या ध्येयधोरणाशी बांधील राहून जे मुद्दे मांडले गेले त्यामध्ये एकमत होऊन जे लोक तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीशी एकसंध राहतील अशा समितीप्रेमींच्या मोट बांधून कार्यकारिणी निवडण्यात येईल व तालुक्यात जागृती सभा घेण्याचा आम्ही निर्धार करीत आहोत.
वरील मुद्दे ध्यानी घेऊन मध्यवर्ती म.ए. समितीने आपली भूमिका /मत जाहीर करून खानापूर तालुका म. ए.समितीला मार्गदर्शन करावे.