शुक्रवारी हैदराबादच्या एका विशेष पथकाने बेळगाव विमानतळावर सर्वेक्षण केले. ILS (इंस्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम) सुरू करण्याची तयारी प्रगतीपथावर असून अंतिम टप्प्यात आहे.बेळगाव विमानतळाच्या झपाट्याने विकास होण्यास उडान योजना कारणीभूत आहे. दर वर्षी या विमानतळावरील प्रवाशांची संख्या वाढत असल्यामुळे बेळगाव विमान तळाचा विकासाचा कल 300 टक्क्याहून अधिक आहे.
या विमानतळावरील विमानांच्या अलगद लँडिंग आणि टेक ऑफच्या दर्जामध्येही सुधारणा होत आहे. बेळगाव विमानतळावरून नवी दिल्ली, मुंबई, बेंगलोर, पुणे, अहमदाबाद, हैदराबाद, इंदोर, अजमेर, तिरुपती आदी प्रमुख शहरांना विमानसेवा सुरू असल्यामुळे या विमानतळाचा प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे.
इंस्ट्रूमेंट लँडिंग सिस्टीम (आयएलएस) ही अतिशय अचूक रेडिओ सिग्नल नेव्हीगेशन मदत यंत्रणा आहे. या यंत्रणेला दोन अँटिना असतात जे अवकाशातील विमान धावपट्टीवर व्यवस्थित उतरावे यासाठी सांकेतिक संदेश विमानाच्या कॉकपिटमध्ये असलेल्या रिसीव्हरकडे पाठवतात. खराब हवामानाप्रसंगी कमी दृश्यमानता असते त्यावेळी हे अँटिना वैमानिकाला अनुलंब आणि क्षैतजक (व्हर्टिकल अँड होरिझाॅन्टल) मार्गदर्शन करतात.
उड्डाण करणाऱ्या विमानांच्या बाबतीत आयएलएस यंत्रणा वापरली जात नाही. बेळगाव विमानतळावर सुरू असलेल्या इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीमचे काम सध्या सुरू असून गेल्या 31 जुलै 2020 रोजी सुरु होणारे या सिस्टीमचे काम कोरोना प्रादुर्भावामुळे प्रलंबित राहिले होते. मात्र त्यानंतर प्रगतीपथावर असलेले हे काम आता अंतिम टप्प्यात आहे.
ILS एअरलाइन्स आणि विमानतळांना कमी दृश्यमानतेच्या परिस्थितीत, जसे की पाऊस आणि कमी ढगांमध्ये ऑपरेशन सुरू ठेवण्यास सक्षम करते. त्यामुळे विमानतळावर उतरण्याची विश्वासार्हता वाढेल. कोणत्याही हवामानात, पायलट लँडिंग करण्यापूर्वी धावपट्टी पाहण्यास सक्षम असणे आवश्यक आहे. ILS निर्णयाची उंची, किंवा मिनिमा, 430 फूट वरून 280 फूट कमी करेल, खराब हवामानात उतरण्याची शक्यता सुधारेल.
#AzadiKaAmritMahotsav
Special Team from Hydrabad conducted Survey at Belagavi Airport.Preparation for Commissioning of ILS(Instrument Landing System) is in progress.
Sh P S Desai,CNS in-charge,Belagavi ,#AAI monitoring this project.@AAI_Official @MoCA_GoI @AAIRHQSR pic.twitter.com/EZCcGs6h8b— Belagavi Airport ಬೆಳಗಾವಿ ವಿಮಾನ ನಿಲ್ದಾಣ (@aaiblgairport) May 6, 2022