हलगा मच्छे बायपासचे काम जोरात सुरू आहे त्यामध्ये येणाऱ्या येळळुर वडगांव रस्त्यावरून जाणाऱ्या ब्रिजची आणि रुंदी वाढवा अशी मागणी येळ्ळूर ग्रामपंचायतीने केली आहेग्राम पंचायत येळ्ळूर च्या वतीने हलगा मच्छे बायपास संदर्भात शुक्रवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला निवेदन देत मागणी करण्यात आली.
येळ्ळूर वडगाव रस्त्यावरून जाणाऱ्या ब्रिजची उंची ही 4मीटर (13 फूट)आहे.व रुंदी 12मीटर(39फूट) आहे याची माहिती मिळताच येळ्ळूर ग्राम पंचायतीच्या वतीनं तातडीने भेट घेऊन याबद्दलची माहिती महामार्ग प्राधिकरणाला दिली.
येळ्ळूर वडगाव रस्त्यावरून भरपूर प्रमाणात रहदारी आहे आणि ती पुढील काळात आणखीन वाढू शकते त्यामुळे रुंदी 12मीटर(39फूट) कमी होते त्यासाठी रूंदी 20मीटर(65फूट) पर्यंत वाढवावी व उंचीत सुध्दा वाढ करावी कारण येळ्ळूर खानापूर,देसुर, सुळगा, राजहंसगड,नंदीहळळी येथील ऊसाचे ट्रॅक्टर ,उसाचे ट्रक व सुक्या चाऱ्याचे ट्रॅक्टर येळ्ळूर वडगाव मार्गे जात असतात त्यासाठी ब्रिजची उंची ही 5.5 मीटर(18फूट) वाढवावी असे निवेदन येळ्ळूर ग्राम पंचायतीच्या वतीने देण्यात आले आहे.
ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील, सदस्य शिवाजी नांदूरकर,रमेश मेनसे,राजू डोन्यांनावर,पिंटू चौगुले,कल्लापा मेलगे आदींचा येळ्ळूर ग्राम पंचायतीच्या शिष्टमंडळात समावेश होता. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रोजेक्ट एम्प्लिमिटेशन युनिट धारवाड आणि दि अशोका बिल्डकॉन लिमिटेड याना कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर लक्ष्मण चौगुले यांना निवेदन दिले.