मान्सूनची चाहूल लागताच येळ्ळूरमधील शेताकऱ्यांनी सध्या पावसामुळे लांबलेल्या पेरणीला सुरवात केली आहे.
दरवर्षी येळ्ळूर पश्चीम भागात 15 मेपासून पेरणीला सुरवात होत असते. मात्र यावर्षी मान्सून पूर्व पाऊस भरपूर प्रमाणात झाल्यामुळे पेरणी लांबली होती.
दरवर्षी मान्सूनपूर्वी धुळवाफ पेरणी होत होती. तथापी यावर्षी अलीकडे सतत पडलेल्या पावसामुळे जमिनीत ओल निर्माण झाल्यामुळे येळ्ळूर परिसरातील पेरणीला थोडा उशिरा प्रारंभ झाला आहे.
या भागात शेतातील अजून बरीचशी कामे पावसामुळे शिल्लक असली तरी जुन जून महिना संपण्यापूर्वी 90 टक्के पेरणी पूर्ण होईल, असा शेतकऱ्यांचा विश्वास आहे. येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांनीही आपल्या शेतात भात पेरणीला सुरवात केली आहे.