बेळगाव महानगरपालिका, बेळगाव स्मार्ट सिटी लि., बुडा आणि इतर कंपन्यांकडून कोट्यावधी रुपये खर्च करून विविध विकास कामे हाती घेण्यात आली असली तरी आपल्या भागात कांहीच विकास कामे सुरू नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. यासाठी कांही भागात कोणती विकास कामे सुरू आहेत याची माहिती आम्ही देत आहोत.
मंजूर होऊन हाती घेण्यात आलेली कामे खालील प्रमाणे आहेत. तेंव्हा नागरिकांनी ही कामे प्रत्यक्षात सुरू आहेत की फक्त कागदोपत्री आहेत? त्याची स्वतः शहानिशा करावी. कारण बऱ्याचदा नागरिकांना स्वतःच्या प्रभागात सुरू असलेल्या विकास कामांचा पत्ता नसतो आणि ते विनाकारण तक्रार करत असतात. नागरिकांचाच विविध कराद्वारे सरकारकडे जमा झालेला पैसा या विकास कामांसाठी वापरला जात असतो. त्यामुळे त्यांनी याबाबतीत जागरूक राहणे गरजेचे आहे.
महानगरपालिका : पॅकेज नं. 4 – प्रभाग क्रमांक 56 मधील कुलकर्णी गल्लीपासून गणेश पेठ मार्गे कलमेश्वर मंदिरापर्यंतच्या भुयारी गटाराची (युजीडी लाईन) सुधारणा. प्रभाग क्र. 39 मधील मलाप्रभा नगर येथील युजीडी लाईनचे रिप्लेसमेंट. त्याप्रमाणे प्रभाग क्र. 50 मधील येरमाळ रोड, प्रभाग क्र. 41 मधील ओमकार नगर व आदर्श नगर, प्रभाग क्रमांक 40 मधील धामणे रोड प्रभाग क्रमांक 39 मधील भारतनगर आणि लक्ष्मीनगर येथील युजीडी लाईनचे रिप्लेसमेंट. निधी 33981004.23 रुपये.
पॅकेज 3 – प्रभाग क्रमांक 42 मधील अनगोळ -वडगाव रोड, येथील युजीडी लाईनसह संत मीरा हायस्कूल रोड येथून अनगोळ -वडगाव रोड कॉर्नर मार्गे मारुती मंदिर अनगोळ पर्यंतच्या युजीडी लाईनची सुधारणा. प्रभाग क्र. 42 मधील भाग्यनगर प्रभाग क्र. 43 मधील दुसरे रेल्वे गेट येथे बुडा स्कीम नं. 8 मधून आणि प्रभाग क्र. 52 मधील रघुनाथ पेठ मेन रोड आणि संभाजी चौक मार्गे बाबली गल्ली कॉर्नरपर्यंत भुयार गटार अर्थात युजीडी पाईप लाईनची रिप्लेसमेंट. निधी 38957449.4 रुपये.
गोकुळनगर महाद्वार रोड दुसरा तिसरा आणि 6 वा क्रॉस मारुती गल्ली, खासबाग होसुर, मठ गल्ली, मुचंडी मळा शहापूर नवी गल्ली, शहापूर आचार्य गल्ली, शहापूर गणेश मार्ग मेन रोड, आरके मार्ग हिंदवाडी, रानडे कॉलनी क्रॉस पहिला, दुसरा तसेच आरके मार्ग नं. 4 -5 आणि आरपीडी रस्ता, अर्बन ढाबा परिसर तसेच आठले गुरुजी मार्ग याठिकाणी भुयारी गटार अर्थात युजीडी पाईपलाईन उपलब्ध करून देणे. निधी 37798994.27 रुपये.
संस्कृती फार्म ते द्वारकानगर मुख्य रस्त्यापासून अंतर्गत रस्ते तसेच सावरकर रोड आणि गुरुदेव रानडे क्रॉस नं.1 या ठिकाणी युजीडी पाईपलाईन उपलब्ध करून देणे. निधी 35288277.2 रुपये.
रामतीर्थनगर येथील कणबर्गी रोड ते केआयएडीबी रोड (उजवी बाजू) येथे डेकोरेटिव्ह लाईट बसवणे आणि त्यांचा पुरवठा. निधी 7512372.89 रुपये. रामतीर्थ नगर येथे कणबर्गी रोड ते केआयएडीबी रोड (डावी बाजू) येथे डेकोरेटिव्ह लाईट बसवणे आणि त्यांचा पुरवठा. निधी 7512372.89 रुपये. रामतीर्थनगर स्कीम नं. 35 मधील शाळा मैदानाची अखेर ते स्टेडियमपर्यंत आरसीसी नाला बांधकाम. निधी 7732005.54 रुपये.