Thursday, January 2, 2025

/

एफएफसीने नातिच्या लग्नासाठी आजीबाईंना केली मदत

 belgaum

पती अंध असल्यामुळे स्वतः राबून घर चालविणाऱ्या भवानीनगर येथील एका आजीबाईंना त्यांच्या नातीच्या लग्नासाठी असलेली मदतीची गरज समाजसेवेचा वसा घेतलेल्या शहरातील फेसबुक फ्रेंड्स सर्कल (एफएफसी) या सेवाभावी संघटनेने पूर्ण केली.

याबाबतची माहिती अशी की, भवानीनगर येथील एक आजीबाई आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह स्वतः चालवतात. त्यांचे वयोवृद्ध पती अंध असून आजीबाई आपल्या दोन नातींना देखील सांभाळ करतात. त्यांनी मोठ्या कष्टाने आपल्या नातींना शिकवून मोठे केले आहे.

आता त्यांच्या मोठ्या नातीचे लग्न निश्चित झाले आले आहे. तथापि घरच्या बेताच्या परिस्थितीमुळे आजींसमोर लग्नाच्या खर्चाचा प्रश्न निर्माण झाला होता. तेंव्हा त्यांच्या मदतीला धावून जाताना फेसबुक फ्रेंड्स सर्कलने त्यांना आवश्यक किराणा मालाचे देण्याबरोबरच आजीला आणि तिच्या नातिला साडी तसेच आजोबांना लग्नाचा पोशाख दिला. त्याचप्रमाणे लग्नामध्ये आवश्यक मुलीच्या मंगळसूत्रातील ‘सोन्याची वाटी’ देखील देऊ केली.Marriage

ही मदत करण्यासह लग्न असल्यामुळे फेसबुक फ्रेंड्स सर्कलने आजीबाई आणि त्यांचे कुटुंब राहात असलेले भाड्याचे घरही रंगून दिले.

आजीबाईंना त्यांच्या नातीच्या लग्नासाठी मदत करण्यासाठी फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर, शांताई वृद्धाश्रमाचे प्रमुख माजी महापौर विजय मोरे, ॲलन विजय मोरे, अवधूत तुडवेकर, पूनम मोहनकुमार, अमर कोल्हापुरे, संतोष ममदापुर, सुनील धोंगडी, गोपाळ धोंगडी, समर्थ पाटील आदींसह एफएफसीच्या अन्य सदस्यांचे सहकार्य लाभले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.