Friday, December 27, 2024

/

बेळगावात रंगली अंधांची फुटबॉल स्पर्धा

 belgaum

फुटबॉल खेळ हा प्रत्येकाला जमेलच असे नाही. यासाठी चौफेर नजरेची आवश्यकता असते. मात्र दृष्टिहीन खेळाडूंनी हा खेळ खेळणे म्हणजे नवलच आहे. बेळगावमध्ये अशाच पद्धतीची फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.आणि या स्पर्धेत प्रत्येकाच्या नजरेला खिळवून ठेवणारा खेळ अंध फुटबॉलपटूनि खेळला आहे.

फुटबॉल क्रीडाप्रकारासाठी दृष्टी असणे हे महत्वाचे आहे. फुटबॉल खेळात गोल करण्यासाठी फुटबॉलवर लक्ष केंद्रित करणे महत्वाचे असते. मात्र बेळगावमध्ये अंध फुटबॉल टूर्नामेंट मध्ये चक्क अंध फुटबॉल पटूनी खेळाचा सामना रंगवत प्रेक्षकांना खिळवून ठेवले. आपणदेखील हा खेळ उत्तमप्रकारे खेळू शकतो हे या अंध फुटबॉलपटूनी दाखवून दिले आहे.

टिळकवाडी येथील बालिका आदर्श विद्यालयाच्या मैदानात तमोप्न ब्लाइंड फुटबॉल असोसिएशनच्या वतीने २०२२ सालच्या ब्लाइंड फुटबॉल टूर्नामेंट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. १३ आणि १४ मे असे दोन दिवस सुरु असलेल्या या स्पर्धेचा शनिवारी अंतिम सामना झाला. या सामन्यात बेंगळुरू आणि बेळगाव मधील संघांनी सहभाग घेतला होता. या सामन्यात बेंगळुरू मधील संघाने बाजी मारली.

आवाजाच्या दिशेने फुटबॉल चा अंदाज घेऊन खेळ रंगवणाऱ्या या अंध फुटबॉल पटूंनी बेळगाव आणि कर्नाटकासह देश विदेशातही आपली कामगिरी दाखवत कौतुक मिळविले आहे. यासंदर्भात प्रशिक्षक सुमित मोटेकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, माहेश्वरी शाळेत आपले दहावीपर्यंतचे शिक्षण झाले असून बुद्धिबळ, स्विमिंगचेही आपल्याला प्रशिक्षण देण्यात आले आहे. याचपद्धतीने आपल्याला फुटबॉल चेही प्रशिक्षण देण्यात आले असून कर्नाटाकात सध्या १५ खेळाळू असल्याचे ते म्हणाले. बेळगावसह अरुणाचल, मेघालय येथील क्रीडापटू देखील आपल्यासमवेत असल्याचे त्यांनी सांगितले.

Blind football
टिळकवाडी येथील बालिका आदर्श विद्यालयाच्या मैदानात तमोप्न ब्लाइंड फुटबॉल असोसिएशनच्या वतीने २०२२ सालच्या ब्लाइंड फुटबॉल टूर्नामेंट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. १३ आणि १४ मे असे दोन दिवस सुरु असलेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना आज शनिवारी पार पडला.या सामन्यात बेंगळुरू आणि बेळगाव मधील संघांनी सहभाग घेतला होता. या सामन्यात बेंगळुरू मधील संघाने बाजी मारली.

आवाजाच्या दिशेने फुटबॉल चा अंदाज घेऊन खेळ रंगवणाऱ्या या अंध फुटबॉल पटूंनी बेळगाव आणि कर्नाटकासह देश विदेशातही आपली कामगिरी दाखवत कौतुक मिळविले आहे. यासंदर्भात प्रशिक्षक सुमित मोटेकर म्हणाले, माहेश्वरी शाळेत आपले दहावीपर्यंतचे शिक्षण झाले आहे.बुद्धिबळ, स्विमिंग बरोबर आपल्याला फुटबॉल चेही प्रशिक्षण देण्यात आले. कर्नाटकात सध्या १५ खेळाडू आहेत. बेळगावसह अरुणाचल, मेघालय येथील क्रीडापटू देखील आपल्यासमवेत असल्याचे त्यांनी सांगितले.

बेळगाव ब्लाइंड असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रशेखर बेंबळगी बोलताना म्हणाले, आमच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांनी मिळविलेल्या यशाबद्दल आपल्याला आनंद होत आहे. फुटबॉल प्रमाणे क्रिकेट, बुद्धिबळ आणि यासह प्रत्येक क्षेत्रात आपले कौशल्य दाखवणाऱ्या विद्यार्थ्यांचे त्यांनी कौतुक केले.
बेळगावमध्ये आयोजित केलेल्या फुटबॉल स्पर्धेत उत्तम कामगिरी केलेल्या अंध क्रीडापटुंनी देशपातळीसह आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील कामगिरी दाखवून नाव कमवावे,असे विकास कलघटगी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.