सोमवारी सकाळी बेळगाव वरून दिल्ली ला जाणाऱ्या स्पाइस जेट च्या विमानाला पक्षाने धडक दिली मात्र सुदैवाने कोणतीही हानी न होता विमान जमिनीवर सुखरूप लँड झाले अशी बातमी पी टी आय या वृत्तसंस्थेने दिली आहे.
इंदिरा गांधी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (IGIA) एअरलाइन्सच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी बेळगाव ते दिल्ली या
बोइंग 737-8 MAX विमानात सुमारे 187 लोक होते.भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (एएआय) अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बेळगाव विमानतळावर जेटला पक्ष्याने धडक दिली मात्र याबद्दल अधिकृत माहिती उपलब्ध झाली नव्हती.
स्पाइसजेटच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले की ९ मे रोजी बेळगाव (कर्नाटक) ते दिल्लीला जाणार्या SG-8472 या स्पाईसजेटच्या B737 विमानाला पक्ष्यांची धडक बसली. विमान दिल्लीत सुरक्षितपणे उतरले,”
फ्लाईट ट्रॅकिंग वेबसाईट त्यानुसार बेळगाव दिल्ली विमान आहे बेळगाव ते दिल्ली विमान सेवा दररोज चालते.
स्पाइसजेटच्या दिल्ली ते झारसुगुडा (ओडिशा) साठी विमान सेवा त्याच विमानाचा वापर करून चालवली जाणार होती, मात्र तांत्रिक अडचणींमुळे काही या सेवला काही तास उशीर झाला.विमानाला उशीर झाल्यामुळे झारसुगुडा येथे व्यवसायासाठी जाणाऱ्या अनेक प्रवाशांची गैरसोय झाली.
बेळगाव दिल्ली या साईट चा दररोजच्या विमान सेवेला प्रतिसाद मिळत असून दररोज 180 हून अधिक प्रवासी ये-जा करत आहेत या विमानसेवा मुळे बेळगाव भागातील लोकांना दिल्लीला जाणे अधिक सोपे झाले आहे.