बेळगाव चे जिल्हाधिकारी डॉ एम जी हिरेमठ आणि त्यांच्या पत्नी तनुजा हिरेमठ यांनी आज बेळगाव येथील सामाजिक कार्याचा मानदंड मानल्या जाणाऱ्या शांताई वृद्धाश्रमाची भेद भेट घेतली. त्यांच्यासोबत दलित संघटनांचे नेते मल्लेश चौगुले व इतर मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आज दुपारी शांताई वृद्धाश्रमात दाखल झाले. येथील आजी-आजोबांची सेवा आणि इतर गोष्टींचा त्यांनी आढावा घेतला. आश्रमाचे कार्याध्यक्ष विजय मोरे संचालक संतोष ममदापूर आणि वसंत बालिगा यांनी आश्रमाच्या कार्याची माहिती दिली. याचबरोबरीने शांताईचे अध्यक्ष विजय पाटील यांनी जिल्हाधिकार्यांना आश्रमाच्या एकंदर प्रवासा संदर्भात माहिती दिली.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि बसवेश्वर यांच्या जयंतीच्या निमित्ताने जिल्हाधिकाऱ्यांनी सामाजिक कार्याचा मानदंड ठरलेल्या शांताई वृद्धाश्रमाचे कौतुक केले. विजय मोरे यांच्या माध्यमातून सुरू असलेले हे काम असेच अविरतपणे सुरू रहावे अशी इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी विजय मोरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
आश्रमातील आजी-आजोबांना भोजन देण्याचे काम सुरू होते. या ठिकाणी स्वतः जिल्हाधिकार्यांच्या पत्नी तनुजा हिरेमठ यांनी पुरण पोळी तयार करून आजी-आजोबांना खाऊ घातले. या प्रकारचे कार्य जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात सुरू राहावे,
या दृष्टीने आपण प्रयत्नशील असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान आश्रमाला जोडणारा बामणवाडी रोड आपण लवकरात लवकर सुस्थितीत आणण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासनही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.