बेळगाव – बेंगलोर नंतर सर्वाधिक विमानांची येजा बेळगावच्या सांबरा विमानतळावर होत आहे. चार विमान कंपन्यांकडून बेळगावातून विमान सेवा दिली जात आहे.
बेळगावातून देशातील विविध राज्यातील 13 शहरांना थेट विमानसेवा सुरू आहे. तर तीन शहरांना वन स्टॉप सेवा आहे.वन स्टॉप मधील भूज सेवा येत्या काही दिवसात सुरू होत आहे. आठवड्यातून तब्बल एकशे चौतीस विमानांची ये-जा बेळगाव विमानतळावर होत आहे.
कर्नाटकातील पहिल्या क्रमांकाचे डोमेस्टिक विमानतळ म्हणूनही बेळगाव ने आपली ओळख तयार केली आहे. कर्नाटक राज्यात आठ विमानतळे आहेत. त्यातील सर्वाधिक व्यस्त विमानतळाच्या यादीत बेळगाव चा तिसरा क्रमांक आहे. बेळगाव शहर महाराष्ट्राच्या सीमेवर असल्यामुळे बेळगावातून महाराष्ट्रात जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे.
बेळगावातून महाराष्ट्रात सर्वाधिक विमानसेवा आहेत. मुंबई, पुणे, नागपूर व नाशिक या चार शहरांसाठी बेळगावातून विमानसेवा आहे.याशिवाय गुजरातमधील अहमदाबाद सूरत या दोन शहरांसाठी विमानसेवा आहे. भूजसाठी विमानसेवा सुरू होणार आहे.
राजस्थानमधील जोधपूर सह दिल्ली,अजमेर, हैदराबाद, इंदोर, तिरुपती या शहरांशी बेळगाव जोडले गेले आहे. कर्नाटकातील बेंगलोर गुलबर्गा या दोन शहरांसाठी बेळगावहून विमानसेवा आहे.भविष्यात शिमोगा आणि म्हैसूर साठी सेवा सुरू केली जाणार आहे.
बेळगावहून देशातील प्रमुख शहरांसाठी विमानसेवा सुरू व्हावी यासाठी घेऊन येथील उद्योजक, व्यावसायिक व लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले आहे. त्याचबरोबर विमानतळ प्राधिकरणाकडून ही विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत.