बेळगाव विमानतळावर ज्या दोन कंपन्यांकडून फ्लाईंग स्कूल अर्थात फ्लाईंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशन (एफटीओ) सुरू करण्यात येणार आहे, त्यापैकी एका कंपनीच्या फ्लाईंग स्कूल उभारणीच्या कामाला प्रारंभ झाला आहे
बेळगाव विमानतळावर संवर्धने टेक्नॉलॉजीस या कंपनीकडून फ्लाईंग स्कूलच्या पाया खुदाईचे काम हाती घेण्यात आले आहे. किरकोळ विद्युत कामे वगळता एफटीओसाठीचा टॅक्सी ट्रक भारतीय विमानतळ प्राधिकरणाने पूर्ण केला आहे.
बेळगाव विमानतळावरील फ्लाईंग स्कूलसाठी गेल्या 28 जून 2021 रोजी भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लीजवर अर्थात दीर्घ भाडेपट्टी करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत.
संवर्धने टेक्नॉलॉजीस वैमानिक प्रशिक्षणासाठी सेसना, डायमंड सारख्या सिंगल आणि मल्टी इंजिन ट्रेनर विमानाची खरेदी करणार आहे. बेळगाव विमानतळावर दोन फ्लाईंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशन (एफटी उघडण्यासाठी दोन कंपन्यांमध्ये वाटप करण्यात आले आहे. बेंगलोरमधील संवर्धने टेक्नॉलॉजीस आणि दिल्ली येथील रेड बर्ड एव्हिएशन यांच्याकडून बेळगावात फ्लाईंग स्कूल उघडण्यात येणार आहे.