जुना पी बी रोड खासबाग येथे किरकोळ कारणावरून वाद झाल्याने मेकॅनिक युवकाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली आहे.महेश कामाणाचे वय 34 रा. हलगा बेळगाव असे घटनेत मयत झालेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत समजलेल्या अधिक माहितीनुसार महेश हा खासबाग ओल्ड पी बी रोड येथे मेकॅनिकल गॅरेज चालवतो शुक्रवारी सायंकाळी कार गाडी ट्रायलला घेऊन गेला असता त्याच्या गाडीला किरकोळ अपघात झाला यावरून झालेल्या वादात त्याच्या पोटावर चाकूने भोसकून हल्ला कऱण्यात आला यात तो गंभीर जखमी झाला लागलीच त्याला उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले मात्र रात्री त्याच्या या घटनेत मृत्यू झाला.
या प्रकरणी शहापूर पोलीसात फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलीस खुनाचे नेमकं कारण तपासत असून आरोपींचा देखील शोध घेत आहेत.पोलीस तपासा नंतर नेमकी माहिती स्पष्ट होणार आहे.
महेश हा हलगा येथील रहिवाशी असून तो एक चांगला चार चाकी मेकॅनिक होता खासबाग येथे कार दुरुस्तीचे गॅरेज चालवत होता किरकोळ अपघाताच्या कारणावरून त्याचा भोसकून खून करण्यात आल्याने त्याच्या मित्र परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Life is not so cheap, Psychological counseling is necessary to all attackers.