राम म्हणजे संस्कार,राम म्हणजे आदर,राम म्हणजे विवेक, राम म्हणजे सतवृत्ती या समाजापुढे असणारी रामाची भूमिका स्वतःच्या हिंमतीने परत एकदा सिद्ध करणारे श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर हे समाजात एक चर्चेचा विषय ठरले आहेत.
औचित्य होते मारवाडी युवा मंच आयोजित ‘नए भारत की नई चुनौतीया’ या विषयावर व्याख्याते आणि जेष्ठ पत्रकार पुष्पेंन्द्र कुलश्रेष्ठा यांच्या व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे….
मुख्य व्याख्यात्याच्या व्याख्याना नंतर वंदे मातरम हे गीत सादर कऱण्यात आले या गीतासाठी अवघे सभागृह जागेवर उभे राहून सावधान स्थितीत उभे होते मात्र श्री राम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर हे मात्र पायातील चप्पल काढून वंदनेत हात जोडून उभा राहीले.सोशल मीडियाच्या कॅमेऱ्याने हा क्षण टिपला आणि सदर फोटो सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला या फोटोचीच चर्चा सर्वत्र बेळगावसह सह परिसरात सुरू झाली आहे.
यानिमित्ताने एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, रमाकांत कोंडुस्कर हे व्यक्तीमत्व हटके आहे.त्यांनी त्यांचा पेहराव,वस्त्र प्रावरण एकदंर वृत्ती परंपरावादी आहे.आपल्या कृतीतूनचं आदर्श निर्माण व्हावा ही त्यांची मनीषा असते ,सांगण्यापेक्षा कृतीवर भर देणारं हे व्यक्तीमत्व बेळगावच्या सांस्कृतिक जनतेला भावणार आहे.
वंदे मातरम गीत म्हणायच्या पहिल्या रांगेत त्यांच्या सोबत मोठं मोठे दिग्गज अधिकारी आजी माजी आमदार लोकप्रतिनिधी सोबत होते सगळे जण सावधान अवस्थेत होते पण चित्ताने आणि वृत्तीने सावधान असणारे एकटेच रमाकांत वेगळ्या कृतीने उठून दिसले.
कोंडुस्कर यांच्याकडून कोणत्याही कार्यक्रमात वंदे मातरमच्या वेळी ही कृती सहज असते मात्र यावेळीची कृती कॅमेऱ्यात कैद झाली अन सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाला त्यांची कट्टर देशभक्त,रियल इंडियन म्हणून सोशल मीडियावर चर्चा होऊ लागली आहे.
अश्या या वेगळ्या कृतिशील व्यक्तीमत्वाचे बेळगावात मोठ्या प्रमाणात चाहते आहेत.काही व्यक्तींच्या साध्या साध्या गोष्टीतून त्यांच्या आदर्श रहाणीमानाची ओळख होते आणि त्यांच्या विषयीचा आदर दुणावत जातो हेच निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.