रोटरी साऊथच्या क्रीडा महोत्सवाला प्रारंभ

0
6
Sports rotry
 belgaum

रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथतर्फे आयोजित करण्यात आलेल्या बेळगाव जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सवाचा उद्घाटन समारंभ आज शनिवारी सकाळी मोठ्या उत्साहात पार पडला.

कॅम्प येथील युनियन जिमखाना मैदान येथे आयोजित क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथचे अध्यक्ष अशोक नाईक सचिव संतोष हत्तरकी, माजी अध्यक्ष अविनाश पोतदार आणि शरद पै, हे उपस्थित होते.

त्याच प्रमाणे क्रीडा स्पर्धा प्रमुख महेश अनगोळकर, स्पर्धेचे चेअरमन डॉ. मनोज सुतार, सचिव वीरधवल उपाध्ये, विक्रम जैन, अनंत कुलकर्णी आदी मान्यवर यावेळी हजर होते. प्रारंभी अध्यक्ष अशोक नाईक यांनी सर्वांचे स्वागत केले. डॉ मनोज सुतार यांनी क्रीडा महोत्सव संदर्भात माहिती दिली.Sports rotry

 belgaum

स्वागत समारंभानंतर शरद पै यांच्या हस्ते बॅडमिंटन कोर्टचे उद्घाटन करण्यात आले. त्याचप्रमाणे अविनाश पोतदार यांनी यष्टी पूजन करून क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन केले.

या पद्धतीने विविध क्रीडा प्रकारांचा शुभारंभ करण्यात आला रोटरी साऊथतर्फे आयोजित या जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सवात सुमारे 100 हून अधिक क्रीडापटूंनी भाग घेतला आहे. या क्रीडा महोत्सवामध्ये क्रिकेट, बॅडमिंटन, कॅरम, टेबल टेनिस आणि बुद्धिबळ या क्रीडा प्रकारांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.