बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुखांच्या (एसपी) निवासस्थान आवारात मोठा साप आढळून आल्यामुळे सर्वांची पाचावर धारण बसली याची घटना आज सकाळी घडली. मात्र सर्पमित्र आनंद चिट्टी यांनी त्या सापाला शिताफीने पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.
बेळगाव जिल्हा पोलसप्रमुखांच्या निवासस्थानी आज शुक्रवारी तेथील कर्मचाऱ्यांना एक साप दृष्टीस पडला. त्यामुळे सर्वांचीच घाबरगुंडी उडून पाचावर धारण बसली.
आवारामध्ये असलेल्या झाडांच्या बुंध्यातील बिळात तो साप शिरला होता. तेंव्हा तात्काळ सर्पमित्र आनंद चिट्टी यांना पाचारण करण्यात आले. झाडाच्या बुंध्याला खाली खोल बिळात शिरलेल्या त्या सापाला बाहेर काढणे कठीण होते. तथापी सर्पमित्र चिट्टी यांनी महत्प्रयासाने त्या सापाला बाहेर काढून शिताफीने पकडले. त्यामुळे उपस्थित सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
पोलीस प्रमुख यांच्या निवासस्थानावर आत शिरलेला साप हा धामण जातीचा बिनविषारी सर्प असून तो भक्ष्याच्या शोधत आला होता. मादी जातीचा हा साप सुमारे 5 वर्षाचा असून या सापापासून फारसा धोका नसतो असे सर्पमित्र आनंद चिट्टी यांनी सांगितले.
जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या निवास्थानी साप आढळून येण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी मागील महिन्यात पोलीस प्रमुखांच्या निवासस्थानाच्या गेटवर सर्पमित्र चिट्टी यांनी धामण साप पकडला होता.