Saturday, June 15, 2024

/

स्केटिंगपटू मनीष प्रभू जिल्हा बाल प्रतिभा पुरस्काराने सन्मानित

 belgaum

बेळगाव रोलर स्केटिंग अकॅडमीचा स्केटिंगपटू मनिष संजीव प्रभू याला 2022 चा जिल्हा बाल प्रतिभा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. स्केटिंग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्याला हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
महिला आणि बालकल्याण खाते तसेच माहेश्वरी अंधशाळा, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात स्केटिंगपटू मनीष प्रभू याला हा पुरस्कार देण्यात आला.

श्री देवराज अरस, श्रीमती सईदा आफरीन बानु, भारती वाळवेकर, उमा सालीगौडर, आनंद लोबो, कविता अक्की यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत मनीष प्रभू याला सन 2022 चा जिल्हा बाल प्रतिभा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.Manish prabhu

दहा हजार रुपये रोख रक्कम, शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.मनीष हा गोवावेस येथील स्केटींग रिंक, केएलई संचलित लिंगराज महाविद्यालय आवारातील स्केटिंग रिंक तसेच गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल स्केटिंग रिंकवर प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विशाल वेसणे, मंजुनाथ मंडोळकर, विठ्ठल गगणे, सक्षम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्केटिंगचा सराव करतो.

 belgaum

त्याला डॉ. प्रभाकर कोरे, माजी आमदार श्याम घाटगे, राज घाटगे, उमेश कलघटगी, प्रसाद तेंडूलकर तसेच आई मंगला प्रभू व वडील संजीव प्रभू यांचे प्रोत्साहन लाभत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.